Monday, September 15, 2025

लग्नाला ५० तर अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोक

लग्नाला ५० तर अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोक

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासूनच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात लग्नाला ५० तर अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोकांना परवानगी दिली आहे. 


राज्य सरकारच्यावतीने ३० डिसेंबरला रात्री ठिक ११ वाजून ५९ मिनिटांनी याबाबतचे अधिकृत परिपत्रक डीजीआयपीआरने ट्विटरवर पोस्ट केले आहे.

https://twitter.com/MahaDGIPR/status/1476621380275736590?t=KhbhR2MF-F_kYL3lU6pKOA&s=19


गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. गुरुवारच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाचे ५ हजार ३६८ नवे बाधित सापडले आहेत. त्यामध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या तब्बल १९८ इतकी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील संभाव्य रुग्णवाढ टाळण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ३१ डिसेंबर अर्थात शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच राज्यात हे निर्बंध लागू केले जाणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांवर विरजण पडले असून या निर्बंधांमुळे जाहीर कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार आहे.

Comments
Add Comment