Friday, May 9, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

नितेश राणे यांची पोस्ट वायरल

नितेश राणे यांची पोस्ट वायरल
क संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून जिल्हा बँकेवर भाजपचाच झेंडा फडकला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याचं दिसत आहे.

या निवडणूकीत भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. या विजयाबाबत नितेश राणे यांच्या अधिकृत फेसबुक पेसवरुन निवडणूक निकालांसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन 'गाडलाच' या आशयाची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
Comments
Add Comment