Wednesday, July 2, 2025

जिल्हा बँकेसाठी मतदान सुरु

जिल्हा बँकेसाठी मतदान सुरु
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. १९ संचालकपदासाठी हि निवडणूक होत असून ३९ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेलं विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल यांच्यात थेट लढत होत आहे.

१९ मतदार संघात ९८१ मतदार आहेत. जिल्ह्यातल्या आठही तहसीलदर कार्यालयात मतदान केंद्र आहेत. तिथे शांतते मतदानाला सुरुवात झाली आहे. कणकवलीत ११ वाजेपर्यंत २५ टक्के तर सावंतवाडीत २६ टक्के मतदान झाले होते.या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाले असल्याने सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
Comments
Add Comment