Monday, July 15, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेसमाजाने उपयुक्तता ओळखून वृत्तपत्रांना मदत करावी

समाजाने उपयुक्तता ओळखून वृत्तपत्रांना मदत करावी

ठाणे :‘प्रसार माध्यामांचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही कमकुवत होईल. त्यामुळे समाजानेच माध्यामाची उपयुक्तता ओळखून वृत्तपत्रांना मदत करावी. पत्रकारांनीही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी. म्हणजे विश्वास वाढेल, असे सांगून प्रबोधनचे मार्केटिंग होणार नाही याची खबरदारी पत्रकारांनी घ्यावी’ असे आवाहन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले.पत्रकार संघाच्या मागण्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात नुकतेच रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दीपप्रज्वलन व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात होऊन या अधिवेशनास प्रारंभ झाला.

यावेळी सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, वृत्तवाहिनी संघाचे प्रदेशाध्यक्ष मनिष केत, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, मुंबई विभागीय अध्यक्ष सागर जोंधळे, ज्येष्ठ पत्रकार अभिजीत राणे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, विदर्भ विभाग प्रमुख बाळासाहेब देशमुख, नागपूर विदर्भ पूर्व अध्यक्ष महेश पानसे, मंत्रालय संपर्क प्रमुख नितीन जाधव, प्रकाश गायकवाड, खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उदय मूळगुंद, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवान चंदे, कोकण विभागीय सचिव किशोर पाटील, कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके, पश्चिम महाराष्ट्र हल्लाविरोधी समिती प्रमुख सुभाष डोके यांच्यासह सर्व विभागीय अध्यक्ष व राज्यभरातून पाचशे पेक्षा जास्त पत्रकार उपस्थित होते.

विशेष म्हणजे या अधिवेशनासाठी गुजरात, गोवा, बेळगाव येथील संघाचे पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. दिवसभरात ज्येष्ठ संपादक, पत्रकार, वृत्त छायाचित्रकार, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया यामधील पत्रकारांनी या अधिवेशनास उपस्थिती दाखवली. यावेळी बोलताना ना. कपिल पाटील यांनी मराठी पत्रकारीतेचा इतिहास आणि सध्याची परिस्थिती यावर नेमकेपणाने बोट ठेवले. पत्रकारांच्या हत्या आणि अटक याचा उल्लेख करत पत्रकारांसमोरील धोके स्पष्ट केले. लोकशाहीत पत्रकार हा चौथा स्तंभ असल्याने लोकशाहीची इमारत मजबूत आहे. बदलत्या परिस्थितीत माध्यमांचा प्रभाव कमी झाला तर लोकशाही कमकुवत होईल. त्यामुळे समाजानेच माध्यमांची उपयुक्तता ओळखून वृत्तपत्रांना मदत केली पाहिजे. त्यासाठी पत्रकारांनीही कोणाच्या सांगण्यावरून बातमी न देता खरी माहिती द्यावी. म्हणजे लोकांचा वृत्तपत्रांवरील विश्वास वाढेल.

आपल्याबाबत कोणाच्या सांगण्यावरून दिलेल्या दोन बातम्याची उदाहरणे देऊन त्यांनी पत्रकरीतेतील चुकीच्या बाबीवरही परखड मत मांडले. पण अपवाद वगळता पत्रकारांमुळेच समाजाचे प्रबोधन होते. त्यामुळे प्रबोधनाचे मार्केटिंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कामाचे कौतुक करून केंद्र स्तरावरील मागण्यांसाठी मदत करण्याची ग्वाही दिली.
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी वृत्तपत्र व पत्रकारांसमोर समस्या आणि वृत्तपत्र आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वस्तात अंक विक्री करण्याचे पारंपरिक धोरण बदलावे तरच या क्षेत्रात काम करणार्यांना रोजगाराचे स्थैर्य मिळेल, असे सांगून पत्रकार संघाच्या वर्षभरातील कामाचा अहवाल सादर केला. सरचिटणिस विश्वास आरोटे व कोकण विभागिय अध्यक्ष नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मान्यवरांचा हस्ते पारसनाथ रायकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर जेष्ठ नगरसेवक संजय तरे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ नाट्यनिर्माते स्वर्गीय दादाजी घोसाळकर यांना कलारत्न तसेच तरुलता धानके यांना प्रसशासकीय भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समता वाकडे यांना सामाजिक पुरस्कार व शिरकुल वैदू यांना सामाजिक पुरस्कार, राजेंद्र खारकर – समाजरत्न पुरस्कार, जितेंद्र पाटील – समाजरत्न पुरस्कार, मिलिंद पूर्णपत्रे – क्रीडारत्न पुरस्कार, शेखर सुपटकर – संगीत व कलारत्न पुरस्कार, अक्षय मालवणकर – सांस्कृतिक पुरस्कार, शशिकांत नाईक – क्रिडाभूषण पुरस्कार, सुनिल मोरे – कलाभूषण पुरस्कार, प्रशांत देशमुख – साहित्यिक पुरस्कार, निळकंठ मोहीते- कोरोना योद्धा पुरस्कारसचिव सागर शिंदे- कोरोना योद्धा, डॉ.श्री. मनीलाल रतिलाल शिंपी – कोरोना योद्धा, दिलीप थोरवे – शैक्षणिक पुरस्कार, भीमाशंकर तोरमल – शैक्षणिक पुरस्कार, भालचंद्र घुगे -प्रशासकीय पुरस्कार, डॉ बाबासाहेब गोडगे. वैद्यकीय, चांदुरकर वाकडे – सामाजिक पुरस्कार, आनंद शर्मा -विशेष पत्रकारिता पुरस्कार सन्मनित करण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -