Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरप्रशासन अद्याप निद्रावस्थेत

प्रशासन अद्याप निद्रावस्थेत

पालघर : पालघर जिल्ह्यात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत असून जिल्हा प्रशासन व वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन याविषयी कशाप्रकारची तयारी करत आहे, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. काल दिवसभरात वसई विरार शहर मनपा क्षेत्रात ८१ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १० रुग्ण सापडल्याचे वृत्त आहे. पण या दोन्ही प्रशासनाच्या माहिती कार्यालयाकडून अधिकृतपणे माहिती दिली जात नाही.गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात, हे दोन्ही प्रशासन संवेदनशील नव्हते. त्यामुळे जिल्हावासीयांना या काळात अनंत अडचणींना सामोरे जावे लागले.

वास्तविक गेल्या आठवड्यापासून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यात कोरोनाची काय स्थिती आहे, याबाबत अपडेट देणारे पत्रक दररोज प्रसिद्धीस देणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या दोन्ही प्रशासनाने आपल्या माहिती कार्यालयातर्फे अपडेट देणे बंद केले.

परंतु आता प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ही व्यवस्था पुन्हा सुरू करणे, आवश्यक होते; पण त्यादृष्टीने कोणतीही हालचाल झालेली नाही. या दोन्ही प्रशासनाचा मागील अनुभव कटू असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. कोविड सेंटर पुन्हा सुरू करणे, टेस्टिंग करणारी यंत्रणा कार्यान्वित करणे, दररोज कोरोना रुग्णांची मृत्यू व नव्या रुग्णाची संख्या, याविषयी प्रसिद्धी पत्रके माध्यमांना देण्यास सुरुवात करणे, आदी त्वरेने करण्याची गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -