SBI बँकेत भर दिवसा फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा

मुंबईतील दहिसर वेस्ट भागातल्या एसबीआय बँकेवरील दरोडा प्रकरणात पोलिसांनी 2 संशयितांना अटक केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सध्या पोलिसांची 8  पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत. काल भरदिवसा या बँकेवर दरोडा पडला होता. त्यावेळी झालेल्या गोळीबारात एका बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. काल दुपारच्या सुमारास बँकेतील अडीच लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. यावेळी त्यांनी फिल्मी स्टाईल एन्ट्री करत गोळीबार केला आणि मोटरसायकलवर पळून गेले. काल दुपारी भर दिवसा गोळीबार करत फिल्मी स्टाईल ही बॅंक लूटण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच एम एस बी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील हाती आलं असून यात घटनेचा थरार कैद झाला आहे.  या आरोपींचा शोध घेण्याकरता मुंबई पोलिसांची टीम तसेच मुंबई क्राइम ब्रान्चची 8  पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत.

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून बँका आणि इतर ठिकाणी दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी यावर कारवाई करत अनेक ठिकाणी गस्ती वाढवल्या आहेत. या वाढत्या घटना कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या असून त्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.
Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई