घटनेची माहिती मिळताच एम एस बी पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील हाती आलं असून यात घटनेचा थरार कैद झाला आहे. या आरोपींचा शोध घेण्याकरता मुंबई पोलिसांची टीम तसेच मुंबई क्राइम ब्रान्चची 8 पथकं तपासासाठी रवाना झाली आहेत.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून बँका आणि इतर ठिकाणी दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी यावर कारवाई करत अनेक ठिकाणी गस्ती वाढवल्या आहेत. या वाढत्या घटना कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या असून त्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.