Friday, July 11, 2025

५ जम्बो कोविड सेंटरची तयारी

५ जम्बो कोविड सेंटरची तयारी

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ५ ठिकाणी जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडून भाडे तत्वावर प्रचलन व व्यवस्थापन सेवा घेण्यात येणार आहे. पालिका त्याकरिता वैद्यकीय संस्थेला तब्बल १०५ कोटींची खैरात देण्यात येणार आहे.


मात्र या संदर्भातील प्रस्तावाला विना चर्चा आणि बिनविरोध मंजुरी देण्यात आली. दरम्यान गेल्या मार्च २०२० पासून कोविडला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल ५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र आता पुन्हा कोविड सेंटर सुरू करणार असून खासगी कंत्राटदाराला पालिका पैसे देणार आहे.



बीकेसी, दहिसर, मालाड, कांजूरमार्ग व सोमय्या या ठिकाणी हे ५ जम्बो कोविड सेंटर कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. या ५ कोविड जम्बो सेंटरच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी ७४८ आयसीयू बेड, २०९९ ऑक्सिजनेटेड बेड, ८०१ नॉन ऑक्सिजनेटेड बेड, १०० पेड्रियाटीक आयसीयू बेड, २० डायलिसिस (आयसीयू) बेड, ४० ट्राएज (आयसीयू) आणि १०० पेड्रियाटीक बेड उपलब्ध होणार आहेत.
महापालिका प्रशासन, प्रति आयसीयू बेडसाठी प्रति दिन ६ हजार रुपये, ऑक्सिजनेटेड बेडसाठी १ हजार ५०० रुपये तर विना ऑक्सिजनेटेड बेडसाठी ८०० रुपये मोजणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >