गावात किराणा दुकानापासून पानटपऱ्या, रस्त्यावरील लहान मोठ्या धाब्यावर देशी- विदेशी दारू सर्रास मिळू लागली आहे. दारू विक्रेते मात्र सव्र नियम डावलून हा व्यवसाय तेजीत करीत आहेत. स्थानिक पोलीस व गुन्हा अन्वेशन विभागाचे कर्मचारी थातूर-मातूर कार्यवाही करून तडजोडीअंती सोडून दिले जाते. रस्त्यावरील सर्व धाब्यावर व परिसरातील बहुतांश गावात बनावट दारूसह देशी दारूची बंदमध्येसुद्धा खुलेआम विक्री केली जाते. यामुळे अवैध व्यवसाय करणारे वरचढ झाले आहे. काहीजण पोलिसांच्या अंगावर धाऊन जात आहे. असे प्रकार नेहमी घडत असताना सुद्धा या परिसरातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी अधिकारी कोणतेच पाऊल उचलत नसल्यामुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहे.
महिलांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. दिवसभर काम करून रात्री धिंगाणा होत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. या सर्व बाबींना राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस अधिकारी हेच पाठबळ देतात की काय? अशी शंका व्यक्त होत आहे. रेसिडेंस्लमध्ये बार व बियरशॉपीला परवानगी नसतानाही ते सुरू आहेत. काही रेस्टॉरंट व बार मालकांनी नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून संडासच्या टाकीवर किचनरुम बनवून ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत. उरण नगरपालिकेला सर्वसामान्यांचे अतिक्रमण दिसते मात्र अशाप्रकारे लोकांच्या जीवाशी खेळणारे कित्येक वर्षांपासूनचे अतिक्रमण दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगरपालिकेचे काही वरिष्ठ अधिकारी वर्ग काही बारमधील अतिक्रमण भागातच मद्याचा आस्वाद घेत असतात त्यामुळे कारवाई प्रश्नच येत नाही अशी चर्चा उरणच्या नाक्यानाक्यावर सुरू आहे.
वाईन शॉपमधून ओरिजन व बनावट दारू उरण शहरात व तालुक्यात घरपोच डिलिव्हरी देत आहेत. वाईन शॉपमधून सकाळी, दुपारी व संध्याकाळी दारूचा माल स्वताच्या वाहनातून किंवा खासगी भाड्याने रिक्षा घेऊन दारू पोहचविली जात आहे. याबाबत उत्पादन शुल्कच्या अधिकारी वर्गाना पूर्वकल्पना असूनही ते याबाबत कधीच कारवाई करताना दिसत नाही..उलट आम्ही अधिकारी वर्गांचे नियमित आर्थिक सबंध जपत असल्याने ते कोणतीच कारवाई करणार नाही अशी दरपोक्ती दारू विक्रेते करीत आहेत.