Monday, October 27, 2025
Happy Diwali

रुग्णवाढ म्हणजे तिसऱ्या लाटेची भीती

रुग्णवाढ म्हणजे तिसऱ्या लाटेची भीती

मुंबई : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचा अंदाज महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. तसेच ओमायक्रॉनचा वेग तीनपट असल्याचेही त्या म्हणाल्या. यामुळे नियम पाळा, लग्न सभारंभाला जाऊ नका अशा सूचना त्यांनी दिल्या.

मुंबईत कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वेगाने होणारा प्रसार पाहता ही तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. यासाठी कोणत्याही लग्न समारंभाला जाऊ नका आणि मी स्वत:ही जाणार नसल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले. तर गर्दीत, सार्वजनिक ठिकाणी अनेकजण मास्क लावत नाहीत. अशा विनामास्कवाल्यांना मास्क लावण्याच्या आणि कोरोनाचे नियम पाळा अशा सूचना महापौरांनी दिल्या आहेत.

मुंबई महापालिका ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज असून जम्बो कोविड सेंटर मनुष्यबळासह सज्ज ठेवणार आहेत असेही महापौर म्हणाल्या आहेत.

Comments
Add Comment