कणकवली : क्वॉयर बोर्डच्या बैठकीचा महाराष्ट्राचा निश्चितच फायदा होणार आहे. काथ्या उद्योगातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यांत या माध्यमातून उद्योग कसे आणता येतील, यासंदर्भात गुरुवारी झालेल्या क्वॉयर बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.
क्वॉयर बोर्डची २३९ वी बैठक हॉटेल निलम्स कन्ट्रीसाईड येथील सभागृहात पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, क्वॉयर बोर्डचे चेअरमन कुपूरामन दुरेपांडेय, बोर्डचे संचालक व्ही. व्ही. रामण्णा (आंध्रप्रदेश) पी. एस. पाटील (गोवा, टी. के. अरविंदाक्षण पिल्लाई केरळ), एम. गोपाळराव (हैद्राबाद) पी. एस. राजेश (केरळ), एस. मोहन केरळ व्ही. एस. भूषणरेड्डी (आंध्रप्रदेश), एस. टी. कृष्णमूर्ती (कर्नाटक), बी. आर. जरना कर्नाटक जोगी गावडा (कर्नाटक) शुभी शोभू (केरळ), क्यॉयर बोर्डचे सेक्रेटरी एम. कुमार राजा या बैठकीत उपस्थित होते.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे म्हणाले, कथ्या उद्योगाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा वाव आहे. यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोकणात काय करता येईल, या दृष्टीकोनातून या बैठकीत सखोल अशी चर्चा झाली. कोकणातील या माध्यमातून येणाऱ्या उद्योगांसाठी कोणत्याही स्थितीत निधी कमी पडू देणार नाही. या उद्योगांसाठी सिंधुदुर्गातील जमीन मालकही जमीन द्यायला तयार आहेत. यामुळे सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगारांच्या संधी उपलब्ध करणे, हाच आमचा हेतू आहे.
या काथ्या उद्योगाच्या माध्यमातून निर्माण होणारे वस्तू स्थानिक बाजारपेठ ते मॉलपर्यंत कशा जातील, हाच आमचा प्रयत्न आहे. काथ्या उद्योगाच्या माध्यमातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यांत काथ्या उद्योगाच्या माध्यमातून जाळे निर्माण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या क्वॉयर बोर्डच्या बैठकीत कोकणात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून उद्योग उभारणीची चर्चा झाली.
यावेळी केंद्रातील वरिष्ठ अधिकारी झोनल संचालक जे. के. शुक्ला, संचालक (प्रभारी) एम. कृष्णा, सिनिअर अकौंट ऑफिसर व्ही. सी. रघुनंदनन सेक्शन ऑफिसर्स सी. एस. शामल, सेल्स ऑफिसर आर. एम. सलीम, पी. एस. सी. बी. सुनीलकुमार, अकौंट मॅनेजर के. व्ही. रेजी, सिंधुदुर्ग सब-श्रीनिवास विलिंगू आदी उपस्थित होते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…