कर्जत : कर्जत तालुक्याचा वाढता विकास पाहता कर्जत व परिसरातील ग्रामस्थांसाठी चांगल्या आरोग्य विषयक सुविधा कर्जत मध्येच मिळाव्यात आणि कुठलाच रुग्ण शहरी भागात उपचारांसाठी जाऊ नये यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतानाच आज कर्जत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर उभारण्यात यावे यासाठी वैद्यकीय अधीक्षक मनोज बनसोडे यांची भेट घेत त्यांना विनंती वजा आंदोलनाचे निवेदन दिले.
कर्जत खालापुर तालुक्यातील अनेक लोकांना नियमित डायलिसिस तसेच चांगल्या उपचारांसाठी पनवेल, वाशी, बदलापूर, मुंबई अश्या विविध ठिकाणी जावे लागते. ही बाब लक्षात कर्जत भाजपच्या वतीने कर्जत उप जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करावे , अशी शासना कडे मागणी केली होती.ती मंजूर देखील झाली होती .परंतु शासकीय दिरंगाईमुळे मुळे डायलिसिस सेंटर चालू झालेले नाही . म्हणुन लोकांची गरज लक्षात घेऊन आज भारतीय जनता पार्टी कर्जतच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज मनोज बनसोडे यांनी भेट घेऊन विनंती वजा आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनिल गोगटे , कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, सरचिटणीस प्रकाश पालकर, माजी शहर अध्यक्ष दिनेश सोळंकी, सोशल मीडिया सह संयोजक रायगड सूर्यकांत गुप्ता, सोशल मीडिया संयोजक मिलिंद खंडागळे, युवा मोर्चा शहर चिटणीस सर्वेश गोगटे, विशाल सुर्वे, दर्पण घारे आणि इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.