Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी

मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील, असं आदेशात म्हटलं आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.मुंबई पोलिसांनी आधी 31 डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी लावली होती त्यानंतर त्याचा कालावधी वाढवून सात जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये जमा बंदी लावण्यात आली आहे ज्यामुळे आता पाच पेक्षा अधिक लोक जमू शकणार नाहीत. तसेच मुंबईमध्ये होणारी सार्वजनिक कार्यक्रम सभा यासाठी सुद्धा शासनाकडून नियम आणि अटी शर्ती घालण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -