Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीसहा महिन्यांत महाराष्ट्रात दगावले २३ वाघ

सहा महिन्यांत महाराष्ट्रात दगावले २३ वाघ

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणकणची माहिती

मुंबई  : महाराष्ट्रात तर अवघ्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या कालावधीत २३ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या २३ वाघांपैकी १५ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने, चौघांचा विष वापरामुळे, दोन वाघांचा शिकारीमुळे, एका वाघाचा रेल्वे अपघातात, तर एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.

सरत्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये देशभरात एकूण १२६ वाघांचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूची संख्या गेल्या एका दशकातील सर्वाधिक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणकडून या वर्षी २९ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, १२६ मोठ्या वाघांपैकी ६० वाघ हे शिकारी, अपघात आणि संरक्षित क्षेत्राबाहेर मानव-प्राणी संघर्षाला बळी पडले आणि त्यात त्यांना जीव गमावावे लागले.

२०१८ च्या जनगणनेनुसार, भारतात २,९६७ वाघ होते. एनटीसीएने २०१२ पासून सार्वजनिकरित्या वाघांच्या मृत्यूची नोंद ठेवली आहे. यावर्षी वाघांच्या मृत्यूची संख्या दशकातील सर्वाधिक असू शकते, अशी शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. याचे कारण म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल ९९ वाघांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी २०१६ मध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तेव्हा ती संख्या १२१वर होती. दरम्यान, वाघांचे वाढते मृत्यू हे चिंतेचा विषय ठरू शकतात. त्यामुळे वाघांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -