मुंबई : वाढीव दंड परवडणारा नाही. वाहतूक नियम पाळा आणि बिनधास्त वाहनावर फिरत राहा. कारण दंड सामान्य नागरिकांना परवडणारा नाही. दंड भरण्यापेक्षा नियम पाळणे, हाच यावर उपाय आहे, असे समुपदेशन पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी येथे बोलताना केले.
२८ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत (नो फाइन डे) म्हणजेच चालकांना दंड न आकारता समुपदेशन जनजागृती सप्ताह आहे. शहरामध्ये ११ ठिकाणी नाकाबंदी करून वाहन चालकाने नियम मोडल्यास त्याचे समुपदेशन करण्यात येत आहे. गुलाबाचे फुल व वाढीव दंडाचे पत्रक देण्यात येत आहे.
पोलिस मुख्यालयात चालकाला नेऊन तिथे समुपदेशन करण्यात येते, पोलिस आयुक्त बैजल यांनी सात रस्ता येथे व त्यानंतर मुख्यालयात जाऊन चालकांना समुपदेशन केले, सिटबेल्ट लावा, हेल्मेट वापरा, सर्व कागदपत्रे जवळ ठेवा. वाहन परवाना, आरसी बुक, पीयूसी बाळगा, रिक्षात तीनच प्रवासी घ्या. लेन कटिंग करू नका, चुकीच्या दिशेने ये-जा करू नका, एवढे नियम पाळले तरी पुरेसे आहे, असे ते म्हणाले.