पालघर : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे. सदर पत्रकात कोविड १९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच ओमायक्रॉन या नवीन प्रकारातील बाधितांची संख्या लक्षात घेता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीकरणासंबंधी पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
१) दि. ०३ जानेवारी, २०२२ पासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील बालकांना कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. सदर लाभार्थ्यांना फक्त ‘कोवॅक्सीन’ लसीच्या डोसचे लसीकरण केले जाईल.
२) १० जानेवारी, २०२२ पासून हेल्थकेअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर यांना ज्यांनी कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीचा आणखी एक डोस देण्यात येईल. सदरील डोस हा दुसरा डोस घेतल्यापासून ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल.
३) तसेच १० जानेवारी, २०२२ पासून ६० वर्षांवरील सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक ज्यांनी कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने व पूर्वपरवानगीने कोव्हीड-१९ प्रतिबंधक लसीचा आणखी एक डोस देण्यात येईल. सदर डोस हा दुसरा डोस घेतल्यापासून ९ महिने (३९ आठवडे) पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वरील लाभार्थ्यांना लसीकरणासाठी को-विन अॅपद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येईल. तसेच, लसीकरणासाठी ऑनसाईट सेवाही उपलब्ध राहील. तसेच, १५ ते १८ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांसाठी केवळ ‘कोवॅक्सीन’ लसीचा पर्याय उपलब्ध असेल.