Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडी‘बालहट्टा’पायी मुंबई मेट्रोचे काम अडकले

‘बालहट्टा’पायी मुंबई मेट्रोचे काम अडकले

मनोज कोटक यांचा ‘मविआ’ला टोला

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या मनोज कोटक यांनी कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर ‘बालहट्टा’पायी मुंबई मेट्रोचे काम अडकल्याचा टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. मागील दोन वर्षांपासून या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होते. उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोतून फेरफटका मारला. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित होते.

आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगर असे अंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत पार केले. जानेवारी २०२२ मध्ये या मेट्रोचा पुढचा टप्पा कार्यन्वयित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभर या मेट्रो उद्घाटनाची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली दिसली. मात्र, याच मेट्रोच्या उद्घाटनावरून भाजपच्या एका आमदाराने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.
“कानपूर मेट्रोचे बांधकाम २०१९ मध्ये सुरु झाले होते, सेवा सुरू झाली. मुंबईमधील मेट्रो तीनच्या मार्गीचं काम मागील अनेक वर्षांपासून सुरू असून बालहट्ट आणि अहंकारामुळे या कामात अडथळे येताहेत,” असा टोला कोटक यांनी लगावला आहे.

इतकचं नाही तर पुढे कोटक यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. “महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वाची कमतरता आहे. मात्र यामध्ये भाजपने कायमच आपली ताकद दाखवलीय. मग ते उत्तर प्रदेशमधील योगीजी असो किंवा महाराष्ट्रामधील देवेंद्र फडणवीसजी असो,” असं कोटक म्हणालेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -