नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचा आराखडा फुटला असल्याची जोरदार चर्चा नाशिक शहरातील राजकीय वर्तुळात सुरू आहे.
याबाबत मात्र महापालिका प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला असून त्यामुळे आराखडा फुटला की नाही, या विषयावर आता शहरांमध्ये चर्चा सुरू आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू होण्याआधीच प्रभाग रचना फुटल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या धमाक्यामुळे विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
निवडक प्रस्थापितांनी सोयीच्या भागात दौरे सुरू केल्यामुळे या चर्चेला बळकटी प्राप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सातपूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दैतकार-पाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना पत्र देऊन न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, मनस, काँग्रेसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी कंबर कसली आहे. या पक्षांच्या नेत्यांचे शहरात दौऱ्यावर दौरे सुरू असताना आता महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा दावा होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…