नवी दिल्ली : “गांधी कुटुंबाने अमेठीतील जनतेचा फक्त मतासांठी वापर केला. अमेठीच नाही, तर रायबरेलीची देखील हीच अवस्था आहे. दोन्ही मतदारसंघात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. हे दोन्ही मतदारसंघ महामार्गाशी जोडण्यासाठी त्यांनी काहीच केले नाही,” अशी टीका स्मृती इराणी यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर केली आहे. एका मुलाखतीत बोलताना स्मृती इराणी यांनी ही टीका केली.
अमेठीच्या जनतेला मागच्या तीन-चार दशकांपासून फक्त आश्वासनेच मिळाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाचे देखील आश्वासन देण्यात आलेले पण, ते अस्तित्वात मात्र आले नव्हते. गेली अनेक वर्षे अमेठीला ज्या गोष्टींची आश्वासने मिळाली होती, त्या सगळ्या गोष्टी आज अस्तित्वात आहेत,” असेही त्या यावेळी म्हणाल्या.
पहिल्यांदा जेव्हा अमेठीत आले तेव्हा येथे जिल्हाधिकारी कार्यालय नव्हते, मुख्य वैद्यकीय अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते, मुख्य शिक्षणाधिकारी कार्यालय नव्हते अस्तित्वात नव्हते. एवढेच नव्हे तर इथे रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या, ट्रॉमा सेंटर नव्हते, महिला आणि मुलांसाठी विशेष रुग्णालये नव्हती, योग्य अग्निशमन केंद्र नव्हते, अशी टीकाही इराणी यांनी यावेळी केली.