Sunday, July 21, 2024
Homeमहत्वाची बातमीकसा झाला जतीन खन्नाचा सुपरस्टार राजेश खन्ना?

कसा झाला जतीन खन्नाचा सुपरस्टार राजेश खन्ना?

मुंबई : आज सुपरस्टार राजेश खन्ना यांची ७९ वी जयंती आहे.  29 डिसेंबर 1942 रोजी पंजाब अमृतसर येथे जन्मलेल्या राजेश खन्ना यांचं खरं नावं जतीन खन्ना….जेव्हा शम्मी कपूरराज कपूरदेवआनंद यासारख्या स्टार्सची चलती इंडस्ट्रीमध्ये ओसरू लागली होती तेव्हाच हिंदी सिनेमांमध्ये राजेश खन्ना नावाच्या सुपरस्टारचा जन्म झाला…….ऑल इंडिया युनायटेड प्रोड्युसर्स टॅलेंट कॉम्पिटिशन जिंकून जतीन खन्नाने सिनसृष्टीमध्ये प्रवेश केला आणि याच जतीन खन्नाने पुढे राजेश खन्ना बनून हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं…..1966 मध्ये आखिरी खत सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये पदार्पण केलंया सिनेमातून राजेश खन्ना झळकले असले तरी त्यांनी साईन केलेला पहिला सिनेमा होता राज… सुरुवातीला कॅमेऱ्याला घाबरणाऱ्या, डायलॉग बोलताना भंबेरी उडणाऱ्या राजेश खन्नाची पुढे हिट झाली ती डायलॉगबाजीच.

युनायटेड प्रोड्युसर्स टॅलेंट कॉम्पिटिशनच्या कराराप्रमाणे राजेश खन्ना यांना औरतडोली आणि इत्तेफाक यासारख्या सिनेमांमधून काम मिळालंमात्रबहारों के सपने या सिनेमातून राजेश खन्ना हे नाव अधिक चर्चिलं गेलं…हा सिनेमा प्रेक्षकांना इतका आवडला की दुस-याच आठवड्यात या सिनेमाचा शेवट चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकांना दु:खाऐवजी हॅपी एंडने करावा लागला. यानंतर राजेश खन्ना झळकला तो आराधना सिनेमातून …आणि एक नवा सुपरस्टार हिंदी सिनेमांना मिळाला….शक्ती सामंता यांचं दिग्दर्शन, रोमान्स आणि ट्रॅजेडी असा कथेतला मसाला, एकापेक्षा एक सरस गाणी आणि गाण्याइतकीची फ्रेश वाटली ती या गाण्यावर झळकलेली जोडी…राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर…

त्यानंतर कटी पतंग, दाग, अमर प्रेम, सच्चा झुठा, आन मिलो सजना यासारखे अनेक सुपरहिट फिल्मस दिले. 

राजेश खन्ना यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे तो अभिनेत्री मुमताज यांचा….या दोघांची ऑन स्क्रीन केमेस्ट्री अफलातून हिट ठरली…..या दोघांनी एक नवा इतिहास हिंदी सिनेमांमध्ये रचला….दो रास्तेबंधनसच्चा झुटादुश्मन, हाथी मेरे साथी, बावर्ची, अपना देशरोटीआप की कसमप्रेम कहानी यासारख्या हिट फिल्मस या दोघांनी दिल्या…..

हृषीकेश मुखर्जी यांच्या आनंद सिनेमामध्ये राजेश खन्ना यांच्यामधल्या संवेदनशील अभिनेत्याचं एक वेगळंच आणि भारावून टाकणारं दर्शन घडलं

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -