Wednesday, July 2, 2025

नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्यास इंडिगो सकारात्मक

नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्यास इंडिगो सकारात्मक

नाशिक  : नाशिकमधून देशात व परदेशात इंडिगो एअर लाइन्सतर्फे विमान सेवा सुरू करण्यात यावी, या विषयावर महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री बाबुभाई राठी सभागृहात इंडिगो एअरलाइन्सचे मॅनेजर सेल्स गौरव जाजू व मॅनेजर कार्पोरेट सेल्स शशांक लठू यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली.



इंडिगो एअरलाइन्सचे मॅनेजर सेल्स गौरव जाजू व मॅनेजर कार्पोरेट सेल्स शशांक लठू यांनी नाशिकमधून विमानसेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरुवातीला महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी स्वागत केले व महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. तसेच नाशिकमधून इंडिगोने देशात व विमानसेवा सुरू करावी. विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्व सुविधा व पोषक वातावरण आहे. इंडिगोला चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगितले.



इंडिगो लवकच नाशिकमधून विविध शहरात विमानसेवा सुरू करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसंगी सुनीता फाल्गुने, संजय जयनवणे, संजय राठी, दत्ता भालेराव, मनिष रावल, व्हिनस वाणी, रवी जैन, राजाराम सांगळे, सहायक सचिव अविनाश पाठक उपस्थित होते.

Comments
Add Comment