Thursday, September 18, 2025

उद्या मार्गशीषमधला शेवटचा गुरुवार, दादरच्या फुल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी

मुंबई : मार्गशीष महिन्यातला उद्याचा शेवटचा गुरुवार आहे  मार्गशीष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे, अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी वैभवलक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यांत महालक्ष्मीस्वरूप जाणून त्यांना हळदी-कुंकु लावतात..  प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला देतात.

तसंच सवाष्णीला फुल किंवा फुलांच्या वेण्या देतात. खास करून अष्टराची फुल देतात, त्यामुळे या दिवसात गोंडापासून अष्टराच्या फुलांची मागणी दुप्पटीने वाढते याच फुलांची खरेदी करण्यासाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते आहे. ही गर्दी पाहून नागरीकांना कोरोनाचा विसर पडला की काय? असा प्रश्न पडतोय. नागरिकांना ना नियमांची पर्वा आहे ना प्रशासनाचा धाक.. दादरच्या फुल मार्केटमध्ये सकाळी साडेपाच पासून झालेल्या गर्दीत नागरिकांचा बेफिकरपणा दिसून आला आहे.. यांना कोण आवरणार असाच प्रश्न आता पडलाय.

Comments
Add Comment