Wednesday, August 6, 2025

आर्थिक मंदी आणि आत्महत्या

आर्थिक मंदी आणि आत्महत्या

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत २१३ जणांनी आत्महत्या केली आहे. तर मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक मंदीचा फटका सगळ्यांना बसला आणि नागरीक नैराश्येच्या खाईत अडकले ...त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्येचं प्रमाण वाढलं असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि नैराश्य वाढण्यास सुरवात झाली आहे. यातून आत्महत्येसारखी टोकाची पाऊले उचलली जात आहेत.


रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत गेल्या अकरा महिन्यात २१३ आत्महत्यांची नोंद झाली. यात गेल्या वर्षीही टाळेबंदीच्या मार्च ते जून या कालावधीत ६५ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. या आत्महत्यांमागची कारणे वेगवेगळी असली तरी आर्थिक मंदीचं सावट अधिक गहिरं आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >