
मुंबई : भाजप-शिवसेनेने युती करावी, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. शिवसेनेला पूर्ण ५ वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने युती करावी, असे रामदास आठवले म्हणाले.
“माझा प्रस्ताव असा आहे की भाजप आणि शिवसेना एकत्र येण्याच्या शक्यतेचा भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊन विचार करावा. भाजप आणि शिवसेना एकत्र येणे ही फार मोठी गोष्ट नाही. अगदी शिवसैनिकांनाही भाजप आणि सेनेची युती व्हावी, त्यांनी पुन्हा सोबत यावे असे वाटते. दोन्ही पक्षांनी एकत्र आले पाहिजे. भाजपने माझ्या या सल्ल्यावर गांभिर्याने विचार करावा, अशी मी विनंती करणार आहे,” असे रामदास आठवले म्हणाले.