Monday, January 19, 2026

वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. वर्षा गायकवाड काल (सोमवारी) अधिवेशनात उपस्थित होत्या. अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाड यांच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 

वर्षा गायकवाड ट्विटमध्ये म्हणाल्या की, "मला आज कळलं की काल संध्याकाळी प्रथम लक्षणं जाणवल्यानंतर माझी COVID-19 साठी चाचणी सकारात्मक आली आहे. माझी लक्षणे तुलनेने सौम्य आहेत. मी ठीक आहे आणि मी स्वतःला वेगळे केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांना खबरदारी घेण्याची विनंती करते."

Comments
Add Comment