Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. मला घाबरवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. मात्र, मी घाबरणार नाही असे रोहिणी खडसे यांनी म्हटले.

रोहिणी खडसे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. यावेळी एकनाथ खडसेदेखील उपस्थित होते. रोहिणी खडसे यांनी सांगितले की, तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्‍याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले.  एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आले होते, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला.

हा हल्ला मला घाबरवण्यासाठी करण्यात आला होता. मात्र, मी या हल्ल्याने घाबरणार नसून महिलांच्या पाठिशी कायम उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहिणी खडसे यांनी हल्ला करणाऱ्यांची नावे उघड केली. हल्ला करणाऱ्यांमध्ये शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील,  पंकज कोळी व छोटू भोई यांचा समावेश असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली.  या दगडफेकीनंतर त्यांनी  रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला नेत रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि चालक सुखरूप बचावले असल्याची माहिती खडसे कुटुंबीयांकडून देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -