Friday, June 20, 2025

सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

मुंबई : बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोलकाता (Kolkata) येथील वुडलँड रुग्णालयात (Woodlands Hospital) त्यांना दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी रात्री त्यांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, सौरव गांगुली यांना पहिल्यांदाच कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण (Coronavirus) झाली होती.


टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना या वर्षाच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्यामुळं सौरव गांगुली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापूर्वी त्यांची एकदा अँजियोप्लास्टि करण्यात आली होती.

Comments
Add Comment