मुंबई : परिवहन प्राधिकरणाकडून टॅक्सीवर रुफ लाइट इंडिकेटर बसविणे आता बंधनकारक केले आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी याबाबतचा निर्णय घेतला गेला होता. कोरोना काळात या निर्णयाची अंमलबजावणी करणे जमले नाही. पण आता परिवहन प्राधिकरणाने ३० जूनपर्यत याकरिता मुदतवाढ दिली आहे.
रूफ लाइट इंडिकेटर असणे अत्यंत गरजेचे- संजय गंगाराम साळगावकर, कुर्ला
हिरवा रंग सेवा उपलब्ध आहे तर लाल रंग प्रवासी टॅक्सीत असल्यामुळे सेवा उपलब्ध नाही आणि पांढरा रंग सेवा बंद असल्याचे संकेत देतील. रंग संगती सोबत मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये मजकूर लिहिलेला असेल. टॅक्सीवर रूफ लाइट इंडिकेटर असणे अत्यंत गरजेचे आहे.