भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. इरफान यांच्या पत्नी आणि सौदीतील सर्वात प्रसिद्ध मॉडेल सफा बेग (Safa Baig) यांनी आज (28 डिसेंबर) आणखी एका मुलाला जन्म दिलाय. इरफान पठाणनं सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिलीय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरफान पठाण आणि सफा बेग यांची पहिली भेट दुबईत झाली होती. इरफान पठाण आणि सफा यांचं लग्न अरेंज्ड आहे. दोघांनी 4 फेब्रुवारी 2016 मध्ये सौदी अरेबियातील पवित्र शहर असलेल्या मक्कामध्ये लग्न केलं होतं. दरम्यान, इरफान पठाण आणि सफा यांनी 19 डिसेंबरला 2016 त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर सफा यांनी आज त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिलाय. इरफान पठाणनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मुलासोबतचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केलाय. “सफा आणि मी आमच्या बाळाचे सुलेमान खानचे स्वागत करतो. दोघेही चांगले आणि सुखरूप आहेत.” असंही त्यानं या फोटोला कॅप्शन दिलंय.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…