Tuesday, May 13, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

इरफान पठाणला पुन्हा मुलगा झाला

इरफान पठाणला पुन्हा मुलगा झाला
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. इरफान यांच्या पत्नी आणि सौदीतील सर्वात प्रसिद्ध मॉडेल सफा बेग (Safa Baig) यांनी आज (28 डिसेंबर) आणखी एका मुलाला जन्म दिलाय. इरफान पठाणनं सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिलीय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरफान पठाण आणि  सफा बेग यांची पहिली भेट दुबईत झाली होती. इरफान पठाण आणि सफा यांचं लग्न अरेंज्ड आहे. दोघांनी 4 फेब्रुवारी 2016 मध्ये  सौदी अरेबियातील पवित्र शहर असलेल्या मक्कामध्ये लग्न केलं होतं. दरम्यान, इरफान पठाण आणि सफा यांनी 19 डिसेंबरला 2016 त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर सफा यांनी आज त्यांच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिलाय. इरफान पठाणनं त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मुलासोबतचा हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केलाय.  “सफा आणि मी आमच्या बाळाचे सुलेमान खानचे स्वागत करतो. दोघेही चांगले आणि सुखरूप आहेत.” असंही त्यानं या फोटोला कॅप्शन दिलंय.
Comments
Add Comment