भारत- दक्षिण आफ्रिका (India vs Sout Africa) यांच्यात सेंच्युरियनमध्ये (Centurion) सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील (First Test Match) दुसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळं रद्द करण्यात आला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी कसं वातावरण असेल आणि खेळ होईल का? याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. अखेर खेळ सुरु झाला, पण भारतीय फलंदाज मात्र तिसऱ्या दिवशी खास कामगिरी करु शकले नाहीत. 3 बाद 272 धावांवर सुरु झालेला खेळ बघता बघता भारताने 7 विकेट गमावल्याने 327 वर सर्वबाद अशी झाली. ज्यामुळे भारताचा पहिला डाव 327 धावांवर आटोपला आहे.
भारताकडून सर्वाधिक धावा केएल राहुलने (KL Rahul) केली. त्याने अप्रतिम शतक झळकावत 123 धावा केल्या. तर मयांक अगरवालने 60 धावा केल्या. या दोघांनंतर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) एका चिवट खेळीचं दर्शन घडवलं असून त्याने 102 चेंडूत 48 धावा केल्या आहेत. पण त्यानंतरचे सर्व फलंदाज बुमराह सोडता दुहेरी संख्याही गाठू शकले नाही. बुमराहने केवळ 14 धावा केल्या. तर ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या आहेत. तर आश्विन, ठाकूर आणि सिराज यांनी 4 धावा केल्या. त्यामुळे भारताचा डाव लवकरच आटोपला.