Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

मुंबईतील ५०० फुटांपर्यंतच्या घरांना सर्व करांतून सूट

मुंबई : मुंबईतील ५०० फुटांपर्यंतच्या घरांना सर्व प्रकारचे कर तसेच सेवाशुल्कातून सूट देण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मुंबई महापालिका सुधारणा विधेयकावर बोलताना त्यांनी ही घोषणा केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी केली होती. राहुल नार्वेकर, अबू आझमी यांनी त्यांचे समर्थन केले होते.



सत्ताधारी शिवसेनेने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ५०० फुटांपर्यंतच्या घरांना करातून सूट देण्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी ५०० फुटांपर्यंतच्या घरांचा केवळ मालमत्ता करच माफ केला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता ५०० फुटांपर्यंतच्या घरांचे सर्व प्रकारच्या करांतून सूट द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी ही घोषणा केली.

Comments
Add Comment