Friday, July 11, 2025

कोरोनामुळे 'जर्सी' सिनेमा पुढे ढकलला

कोरोनामुळे 'जर्सी' सिनेमा पुढे ढकलला

 मुंबई : शाहिद कपूरचा जर्सीही हा सिनेमा 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय होऊ शकत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.


सिनेमा नेमका कधी रिलीज होईल? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक माहिती देतील असं सांगण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून सिनेमातील गाणी आणि पोस्टर रिलीज होत असल्याने या सिनेमाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. पण आता रिलीज डेट पुढे गेल्याने प्रेक्षक नव्या तारखेची वाट पाहत आहेत. दरम्यान हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होईल अशी अफवाही समोर येत होती. पण चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी असं काही होणार नसल्याचं ट्वीट केल आहे.

Comments
Add Comment