Sunday, October 26, 2025
Happy Diwali

भास्कर जाधव 'नाचे'

भास्कर जाधव 'नाचे'
मुंबई : कोकणात काही भागात नाचे आहेत, ते होळीच्या दिवशी पैसे दिले की नाचतात, त्यातला तो प्रकार विधानसभेत झाला असे म्हणत, राणे यांनी भास्कर जाधवांचा समाचार घेतला आहे. पंतप्रधानांवर कोण बोललं तर ऐकून घेणार नाही, नक्कल केली तर सेम उत्तर देऊ, आमच्यातही नकलाकार आहेत, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच भास्कर जाधव हे नाचे असल्याची टीका त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे म्हणाले की,सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. जिल्हा बँक निवडणुकीत आमच्याकडे सत्ता आल्यास त्यांनी केलेले गैरप्रकार उघड होतील. त्या भीतीतून नितेश राणे यांना गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका आमदारासाठी एवढी मोठी यंत्रणा कामी लावली आहे. एखाद्या दहशतवाद्यासाठी तरी यंत्रणा कामाला लावली होती का, असा मुद्दाही राणे यांनी उपस्थित केला आहे.. नितेश राणे हे कुठे आहेत, हे सांगायला मुर्ख वाटलो का, असेही नारायण राणे यांनी म्हटले. अनिल देशमुखही काही दिवस अज्ञातवासात होते, याची आठवणही राणे यांनी करून दिली. आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायरीवर आंदोलन करताना मांजरीचा आवाज काढला होता. नितेश यांच्या कृतीला नारायण राणे यांनी अप्रत्यक्ष समर्थन केले. आदित्य ठाकरे आणि मांजरीचा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला. मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा? असा उलट सवालही त्यांनी केला. वाघाची मांजर कधी झाली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसंच कोण अजित पवार? त्यांना ओळखतही नसल्याचे म्हणत नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल केला. कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांचा संदर्भ देऊ नका असेही राणे यांनी म्हटले. कोकणात पूर, नैसर्गिक वादळ आले तेव्हा अजित पवार कुठे होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Comments
Add Comment