
भाईंदर : नवघर पोलिसांनी मंगळवारी सकाळपासून मिरा-भाईंदर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. नवघर पोलिसांनी गोडदेव नाका, नवघर नाका, फाटक रोड, भाईंदर स्टेशन परीसरात नाकाबंदी करत जवळपास दिवसभरात १०० हून अधिक जणांवर कारवाई केली. त्यांच्या कडून दंड वसूल करत त्यांना पावती देण्यात आली असल्याची माहिती नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांनी दिली.
विना मास्क फिरणाऱ्यांना यापुढे मास्कचा वापर करण्याचे सांगण्यात आले आहे.