Tuesday, November 12, 2024
Homeमहत्वाची बातमीनाशिकमध्ये ३ मुलांचा बुडून मृत्यू

नाशिकमध्ये ३ मुलांचा बुडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मखमलाबाद येथे तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाटाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या तिन्ही मुलांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या मखमलाबाद पेठ लिंक रोडवरील तुळजाभवानी नगर येथे ही घटना घडली. निलेश मुळे, प्रमोद जाधव, सिद्धू धोत्रे अशी मुलांची नावे असून या तिघांचे वय अंदाजे १४ ते १५ वर्षे आहे. हे तिन्ही मित्र मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या शाळेतील इतर ५ मित्रांसह पाटावर पोहोण्यासाठी गेले होते.

पाण्यात उतरल्यानंतर सर्वजण आनंद लुटत होते. पण पाण्यात पुढे गेल्यावर त्यांना पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे या पाच जणांमधील तिघेजण पाण्यात बुडू लागले. आपले मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून दोघांनी आरडाओरडा केला आणि घाबरलेल्या या मुलांनी नंतर या ठिकाणाहून पळ काढला. नंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिघेजण पाण्यात बुडाल्याचे आढळले. त्यांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला आणि पोलिसांना दिली.

त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात तिघांना पाण्याबाहेर काढले आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र दुर्दैवाने या तिघाही मुलांचा उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -