Wednesday, July 9, 2025

उल्हासनगरात वृद्धाला लुटले

उल्हासनगरात वृद्धाला लुटले

उल्हासनगर :उल्हासनगरात पायी निघालेल्या एका वयोवृद्ध नोकरदाराला तू गुटखा विकतोस, असा दम भरून त्याची रिक्षाचालकाच्या मदतीने चेकिंग करणाऱ्या एकाने त्याच्याकडील २४ हजार रुपये लुटले आहेत.



पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६२ वर्षीय महेश सरानी हे गेल्या १५ वर्षांपासून खेमसन ट्रेडर्समध्ये मार्केट कलेक्शन व ऑर्डर घेण्याचे काम करतात. सरानी हे दुपारी अडीचच्या सुमारास डॉल्फिन रोडवरून पायी जात असताना बाजूला रिक्षा उभी होती. रिक्षाचालकाने साहबने रिक्षामे बुलाया है, असे सरानी यांना सांगितले. ते रिक्षाकडे गेले असता आतमध्ये बसलेल्या इसमाने तुम गुटखा बेचता है, मुझे तुम्हारी थैली चेक करनी है, असा दम भरून थैली आणि त्यांची झडती घेतली व खिशातील २४ हजार रुपयांची रोकड लुटून नेली


. ही घटना १३ डिसेंबरची असून याप्रकरणी महेश सरानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय आव्हाड तपास करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा