नागपूर : काय केले नितेश राणेंनी? काही संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांनी कोणाला मारले नाही, नितेश राणेंनी काहीही केलेले नाहीये, सरकारला काय करायचे ते करू द्या, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी नागपुरात एका कार्यक्रमासाठी जात असताना प्रसारमाध्यमांसोबत बोलताना या विषयावर भाष्य केले आहे. तसेच, आमदार नितेश राणे अज्ञातवासात असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.