Friday, July 4, 2025

हल्ला प्रकरणात मला गोवण्याचा डाव

हल्ला प्रकरणात मला गोवण्याचा डाव

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना कार्यकर्ता संतोष परबवरील हल्ला प्रकरणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मला गोवण्याचा डाव आहे, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी व्हीडिओ क्लिपद्वारे केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपप्रणीत सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. पोलिसांच्या चौकशीची दिशा पाहता या प्रकरणात मला अडकविले जाण्याची शक्यता आहे, असे नितेश राणे यांनी पुढे म्हटले आहे.



या व्हीडिओत आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपप्रणीत सिद्धिविनायक सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे काहींना सहन होत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मला संतोष परब हल्ल्यातील केसमध्ये गुंतवत असल्याचे दिसून येत आहे. ज्याप्रमाणे मागील दोन वर्षे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर चुकीच्या केस टाकल्या जात आहेत. तसाच अनुभव मलाही सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत येत असल्याचे आमदार नितेश राणे यांनी या व्हीडिओत म्हटले आहे.

Comments
Add Comment