Thursday, October 30, 2025
Happy Diwali

पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द

पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघात (India vs South Africa) सध्या पहिला कसोटी सामना सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सेंचुरियन मैदानात हा सामना सुरु असून पहिल्या दिवशी भारताने प्रथम फलंदाजी करत दमदार सुरुवात केली. केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर भारताने 3 बाद 272 धावा केल्या. पण दुसऱ्या दिवशी ही आघाडी वाढवता आली नाही कारण पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळच होऊ शकला नाही. आता तिसऱ्या दिवशीचा खेळ होईल का? आणि कसा होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. तिसऱ्या दिवशी पाऊस न होण्याची दाट शक्यता असली तरी भारतीय खेळाडूंना एक मोठी धावसंख्या उभी कऱण्यासाठी काहीसा वेगवान आणि सावध खेळ दाखवणं गरजेचं आहे. आता कसोटीचा एक दिवस वाया गेल्याने भारताला वेगवान खेळ दाखवून विजय मिळवण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागणार आहेत.
Comments
Add Comment