लग्नानंतर कतरिना कैफने दिल्या सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा



मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) तिच्या खास मित्राला अर्थात सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिना कैफने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानचा अॅक्शन मोडमधला फोटो शेअर करत कतरिनाने लिहिले आहे,"सलमान खान तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यातला प्रेमळ स्वभाव आणि चेहऱ्यावरची चमक कायम अशीच राहुदे". 


कतरिनाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की,"लग्नानंतरदेखील सलमान आणि कतरिनाची मैत्री पूर्वीसारखीच राहणार आहे. कतरिना दरवर्षी सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. त्यामुळेच लग्नानंतरदेखील तिने सलमानला खास शुभेच्छा दिल्या आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला सलमान खानची हजेरी नव्हती. त्यामुळे चाहते वेगवेगळे अंदाज बांधत होते. पण 
कतरिनाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, कतरिना - विकीच्या लग्नानंतरदेखील सर्व काही पूर्वीसारखेच आहे. आता सलमानचं यावर उत्तर असेल त्याचेदेखील अपडेटस लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. 


 

Comments
Add Comment

'धुरंधर'ची बॉक्स ऑफिसवर चलती! दोन दिवसांत ५० कोटींचा टप्पा पार

आदित्य धर यांचा वादग्रस्त धुरंधर अखेर ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या

हिंदी 'बिग बॉस सीझन १९' चा अंतिम सोहळा! कोण कोरणार ट्रॉफिवर नाव?

तीन महिन्यांहून अधिक काळ नाट्यमय संघर्ष, युती आणि भावनिक चढ-उतारांनंतर, 'बिग बॉस १९' चा महाअंतिम सोहळा आज पार पडणार

प्रियाकां चोप्राच्या बहिणीने स्वीकारला इस्लाम धर्म ?

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये चमकलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या दोन बहि‍णीही मनोरंजनविश्वात चमकत

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

पेड पब्लिसिटीवर भडकली यामी गौतम

दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने इंडस्ट्रीमध्ये चालत असलेल्या ‘पेड