Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीलग्नानंतर कतरिना कैफने दिल्या सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नानंतर कतरिना कैफने दिल्या सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) तिच्या खास मित्राला अर्थात सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिना कैफने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानचा अॅक्शन मोडमधला फोटो शेअर करत कतरिनाने लिहिले आहे,”सलमान खान तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यातला प्रेमळ स्वभाव आणि चेहऱ्यावरची चमक कायम अशीच राहुदे”. 

कतरिनाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की,”लग्नानंतरदेखील सलमान आणि कतरिनाची मैत्री पूर्वीसारखीच राहणार आहे. कतरिना दरवर्षी सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. त्यामुळेच लग्नानंतरदेखील तिने सलमानला खास शुभेच्छा दिल्या आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला सलमान खानची हजेरी नव्हती. त्यामुळे चाहते वेगवेगळे अंदाज बांधत होते. पण 
कतरिनाच्या या पोस्टवरून हे स्पष्ट झाले आहे की, कतरिना – विकीच्या लग्नानंतरदेखील सर्व काही पूर्वीसारखेच आहे. आता सलमानचं यावर उत्तर असेल त्याचेदेखील अपडेटस लवकरच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -