मुंबई : आर्मी भरती प्रक्रियेचा पेपर लिक केल्याप्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई केलेय. सीबीआयनं लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई अलोक कुमार आणि अलोक कुमारची पत्नी प्रियांका यांना अटक. 2019 मधे सैन्याच्या क दर्जाच्या पदांची भरती करण्यासाठी घेण्यात आलेल्या ‘परिक्षेची ॲन्सर की’ या आरोपींकडे असल्याच समजल्यावर सी बी आय च्या एन्टी करप्शन विभागाकडून या आरोपींवर नजर ठेवण्यात आली आणि त्यांचे कॉल रेकॉर्डिं करण्यात आले. त्यामधे या चौघांनी चाळीस ते पन्नास हजार रुपयांमध्ये आर्मीच्या ‘क’ दर्जाच्या पदांची ‘ॲन्सर की’ विकल्याच आढळून आलं आलं.
यातील लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत असून हवालदार सुशांत नाहक हा देखील दक्षिण मुख्यालयात तैनात आहे. तर शिपाई अलोक कुमार हा कर्नल विकास रायझादाच्या ऑफीसमधे काम करतो. अलोक कुमारची बायको प्रियांका हीच्या मोबाईलवरून ॲन्सर की पाठवण्यात आल्याच सी बी आय च्या तपासात दिसून आलय. त्याचबरोबर या चौघांचा सहभाग 2021 मधे झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील असल्याच सी बी आयला आढळून आलय.