Monday, July 15, 2024
HomeUncategorizedलोणावळ्यात थर्टी फर्स्टला हॉटेल्स, रिसॉर्ट फूल

लोणावळ्यात थर्टी फर्स्टला हॉटेल्स, रिसॉर्ट फूल

पुणे : थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर नाताळच्या सुट्या आल्याने पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. लोणावळा-खंडाळ्यात नाताळच्या सुट्या, तसेच नववर्षाच्या पूर्वसंध्येस परिसरातील हॉटेल, रिसॉर्टच्या बुकिंग, तसेच अनेक सेकंडहोम हाउसफुल झाले असून, बुकिंग सरासरी साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत झाले आहे. थर्टी फर्स्टला हॉटेल्स, रिसॉर्ट फूल होतील, अशी आशा आहे.सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत, नव्या वर्षाच्या स्वागतास पर्यटन नगरी लोणावळा सज्ज होत आहे. लोणावळ्याचे अर्थकारण प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे.

नूतन वर्षानिमित्त मौजमजा करण्यासाठी, तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यादरम्यान सेकंड होम बरोबरच बहुतांशी हॉटेल, तसेच खासगी बंगल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य असते.पवन मावळ, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगडसह लोणावळ्यातील विशेषतः लायन्स पॉइंट, खंडाळा येथील सनसेट पॉइंट येथे पर्यटकांसह हौशी ट्रेकरची पसंती आहे. पर्यटकांचे हॉटेल व रिसॉर्टपेक्षा खासगी बंगल्यांनाच अधिक प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -