Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

खेड रेल्वे स्टेशनसमोर गांजाची विक्री करणाऱ्या दोघांसह मुद्देमाल जप्त

खेड रेल्वे स्टेशनसमोर गांजाची विक्री करणाऱ्या दोघांसह मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : खेड रेल्वे स्थानकाजवळ एक किलो वजनाच्या २५ हजार ४२५ रुपये किमतीच्या गांजासह दोघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सुरू आहे. रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील प्रशांत प्रभाकर बोरकर वय ६५) यांनी खेड येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, निरंकार राजेंद्र शिंदे ऊर्फ नदीम समीर जसनाईक (वय २१, रा.जलाल शेख मोहल्ला, भोस्ते, खेड) व तौसिफ इक्बाल चौगुले (वय २१, रा. भोस्ते, खेड) हे दुचाकी (एमएच ०८ ए ए एल ०९२५) वरूनखेड रेल्वे स्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचला. त्यामध्ये रात्री ८.२० वाजता दोघांना ताब्यात घेण्यात आले. यात एक किलो गांजा सापडला. पोलिसांनी दुचाकीसह सॅमसंग कंपनीचा मोबाईल व २ हजार ८४० रुपये रोकड असा एकूण १ लाख ८ हजार ६२५ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गांजा विक्री केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक पोलीस करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >