Saturday, May 31, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शाहचा साखरपुडा दणक्यात पडला पार

ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शाहचा साखरपुडा दणक्यात पडला पार

मुंबई : अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा नुकताच साखरपुडा पार पडलाय. दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत ऋताचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी दोघांचा परिवार आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा थाटामाटात पार पडलाय.


सोशल मिडीयावर तर ऋताच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. यावेळी ऋता आणि प्रतिकने एकमेकांना अंगठी घालुन या नात्याचा नव्या प्रवासाला सुरुवात केलीय. यावेळी ऋता आणि प्रतिकने डान्सही केला.


अनेक सेलिब्रिटींची हजेरी या सोहळ्यात पाहायला मिळाली. हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, अंजिक्य राऊत यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. ऋता आणि प्रतिकनेही सोशल मिडीयावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेयर केले आहेत.


दोघांचा विवाह सोहळा पार पडणार असल्याचीही चर्चा आहेत. प्रतिक हा हिंदी मालिकांसाठी दिग्दर्शन करत असून त्याने अनेक लोकप्रिय मालिकांचं दिग्दर्शन केलय. शिवाय प्रसिद्ध अभिनेत्री मुग्धा शाह यांचा तो मुलगा आहे.

Comments
Add Comment