Monday, May 5, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीसिंधुदुर्ग

मालवण समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजला

सिंधुदुर्ग : ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत असा दुहेरी योग साधण्यासाठी मालवणात राज्यभरातले अनेक पर्यटक दाखल झाले आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या पाहुणचारासाठी पर्यटन व्यावसायिक सुद्धा सज्ज झाले आहेत.

गेले दोन तीन दिवस मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी किनारपट्टी ते बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत, हॉटेल्स लॉजिंग, रिसॉर्ट बऱ्यापैकी फुल झाले आहेत, कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली दीड वर्ष पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता मात्र आता हा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आला आहे. ख्रिसमसची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पर्यटक मालवण भागात दाखल झाले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून मालवण येथील शिवरायांच्या किल्ले सिंधुदुर्ग वर मालवण बंदर जेटी चीवला बीच तारकर्ली देवबाग दांडी या किनारपट्टी परिसरावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणची हॉटेल, लॉजिंग, खाजगी सरकारी रिसॉर्ट सुद्धा गजबजून गेली आहेत. राज्यात नव्याने शिरकाव केलेल्या ओमीक्रोन विषाणूच्या धोक्यामुळे मालवणातील पर्यटन व्यावसायिकांनी खबरदारी घेतली असून कोरोनाचे अटी शर्तीं आणि नियम लक्षात घेऊन पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Comments
Add Comment