जैसलमेर - राजस्थानातील भारत पाकिस्तान सीमेजवळ भारतीय हवाई दलाचे मीग-२१ लढाऊ विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या दुर्घटनेत विमानाचे पायलट विंग कमांडर हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाने ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या. तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र विंग कमांडर हर्षित सिन्हा यांना वाचविण्यात यश मिळाले नाही. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
एलओसीवर कोसळले मीग-२१, वैमानिकाचा मृत्यू
December 25, 2021 02:59 PM 89
Comments