पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर २८ डिसेंबर रोजी दोन तासांचा 'ब्लॉक'

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर पुढील आठवड्यात २८ डिसेंबर रोजी दोन तासांचा 'ब्लॉक'  राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे - मुंबई द्रुतगती महामार्ग २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान 'ब्लॉक' केला जाणार आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील 'ओव्हरहेड गँट्रीस्ट्रक्चर'वर संदेश फलक बसविण्याचे काम होणार आहे. यामुळे मुंबईला जाणारी रस्त्यावरील दोन मार्गिका बंद करून एकाच मार्गावरून वाहने जाऊ दिली जातील.


यावेळी सर्व अवजड व माल वाहतूक करणारी वाहने कामापूर्वी थांबविण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी तसेच इतर प्रवासी वाहने एका मार्गिकेवरून संथगतीने सोडण्यात येणार आहेत. महामार्ग सुरक्षा पथकाच्या पुणे विभागाचे पोलीस निरीक्षक सजन एच. सस्ते यांनी ही माहिती दिली.

Comments
Add Comment

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद