Wednesday, October 9, 2024
Homeक्रीडा‘बॉक्सिंग डे’ एक; कसोटी सामने दोन

‘बॉक्सिंग डे’ एक; कसोटी सामने दोन

मुंबई : सेंच्युरियन/मेलबर्न(वृत्तसंस्था) : ख्रिसमस (नाताळ) आणि इंग्रजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर खेळल्या जाणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीमध्ये अनोखा योग जुळून आला आहे. यंदा एक नव्हे तर दोन ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेला भारताच्या संघासमोर यजमानांना लोळवण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, अॅशेस मालिकेतील सलग दोन विजय मिळवलेल्या ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडविरुद्ध पारडे जड आहे. उभय संघांमधील मालिका या आयसीसी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतर्गत (डब्लूटीसी) खेळल्या जात आहेत.

भारतासमोर संघनिवडीचा मोठा पेच आहे. काहींची निवड निश्चित असल्यामुळे मध्यमगती गोलंदाज-फलंदाज अथवा स्पेशालिस्ट फलंदाजाला संधी द्यायची, असा प्रश्न कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना सतावत आहे. ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत पावसाचा व्यत्यय येणार असल्यामुळे जोहान्सबर्गची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक राहील, असे बोलले जात आहे. खेळपट्टीवर ओलावा आणि दमटपणा राहणार असल्यामुळे कर्णधार आणि प्रशिक्षकांना थेट अष्टपैलू खेळाडूची निवड करावी लागणार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाची मधली फळी कच खात आहे, हे लक्षात घेतल्यानंतर आफ्रिकेच्या माऱ्याला सहजपणे तोंड देऊ शकेल, अशा फलंदाजाची निवड करायची, असा विचार दोघांच्या मनात सुरू आहे.

भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेला आता संघात स्थान मिळवण्यासाठी मुंबईच्याच शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर यांच्यासहित हनुमा विहारी यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांना पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळणार आहे. इशांत शर्मा सध्या फाँर्म मिळवण्यासाठी झगडत असल्यामुळे त्याच्या जागी सिराजला स्थान देण्यात येणार आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत शार्दूल ठाकूरने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

डीन एल्गरच्या नेतृत्वाखालील यजमान संघात कॅगिसो

रबाडा, ऍन्रिच नॉर्टजे तसेच ड्युआनी ऑलिव्हर या वेगवान त्रिकुटाचे पुनरागमन झाले आहे.
भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
द. आफ्रिका : डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बवुमा (उपकर्णधार), क्विंटन
डी कॉक (यष्टीरक्षक), कॅगिसो रबाडा,
सॅरेल इर्वी, ब्युरॉन हेंड्रिक्स, जॉर्ज लिन्डे, केशव महाराज, लुन्गी एन्गिडी, आयडन मर्कराम, विआन मुल्डर, एन्रिच नॉर्किया, कीगॅन पीटरसन, रॉसी व्हॅन डर ड्युसेन, काइल व्हेरीन्नी, मार्को जॅन्सेन,
ग्लेंटन स्टुर्मन, प्रीनेलेन सुब्रायन, सिसान्डा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर.
वेळ : दु. ३.३० वा,

प्रेक्षकांना ‘नो एन्ट्री’

‘बॉक्सिंग डे’ कसोटी प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळली जाणार आहे. ओमायक्रॉनचे संकट पाहता या कसोटीसाठी तिकिटांची विक्री केली नसल्याचे दक्षिण आफ्रिका बोर्डाने यापूर्वीच जाहीर केले आहे. या सामन्यासाठी मोजक्या आणि महत्त्वपूर्ण प्रतिनिधींना मैदानावर जाण्याची परवानगी आहे.

पावसाचे सावट

पहिला कसोटी सामना सुरळीत पार पडण्यात पावसाची भूमिका राहील. पहिले दोन दिवस जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिसऱ्या दिवशीही अधून-मधून सरी पडतील, असेही सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -